ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ग्रामपंचायत कर्मचारी महेश हडकर यांचा प्रामाणिकपणा…!

ग्रामपंचायत कर्मचारी महेश हडकर यांचा प्रामाणिकपणा…!

प्रकाशन: 11 May 2022 05:09 PM
वाचन संख्या 29

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बांदिवडे येथे रस्त्यात सापडलेला मोबाइल मूळ मालकाला परत करत बांदिवडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे. येथील ग्रामपंचायत कर्मचारी महेश दत्ताराम हडकर याना मळावाडी तरी नजीक रस्त्यावर अँड्रॉईड मोबाइल पडलेला आढळून आला. मोबाइल ला पॅटर्न लॉक असल्याने महेश याने  प्रवीण चौकेकर यांच्या मदतीने मोबाइल मालकाचा शोध घेतला. बांदिवडे येथील आरोग्य सेवक राहुल काळे यांचा सदर मोबाइल असल्याचे कळल्यानंतर राहुल यांच्या हाती महेश हडकर यांनी तो मोबाइल सुपूर्द केला. ग्रामपंचायत कर्मचारी महेश हडकर यांच्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक होत आहे. आरोग्य सेवक राहुल काळे यांनी हडकर यांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स