ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात रुबाब द परफेक्ट मेन्स शाॅपचा भव्य रुबाबदार उद्घाटन सोहळा प्राईड स्क्वेअर काॅम्प्लेक्स मध्ये संपन्न...!

मालवणात रुबाब द परफेक्ट मेन्स शाॅपचा भव्य रुबाबदार उद्घाटन सोहळा प्राईड स्क्वेअर काॅम्प्लेक्स मध्ये संपन्न...!

प्रकाशन: 11 May 2022 08:51 PM
वाचन संख्या 503

उद्योजक प्रीतम विलास गावडे यांच्या मातोश्री प्रणाली विलास गावडे यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन.

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची विशेष उपस्थिती..

युवा उद्योजक सनी भैय्या यांची मराठी उद्योजकता शाॅप फ्रॅन्चायझी.

मालवण | सहिष्णू पंडित : मालवण शहरातील ‘रुबाब द परफेक्ट मेन्स शाॅप ‘ चे आज सायंकाळी शानदार व भव्य उद्घाटन झाले. उद्योजक प्रीतम विलास गावडे यांच्या मातोश्री श्रीमती प्रणाली विलास गावडे यांच्या हस्ते रुबाब द परफेक्ट मेन्स शाॅपचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर हे विशेष अतिथी होते.

चौके मालवणचे उद्योजक प्रीतम विलास गावडे यांच्या रुबाब द परफेक्ट मेन्स शाॅप या महत्वाकांक्षी रुबाब द परफेक्ट मेन्स शाॅप मध्ये ब्रॅन्डेड जीन्स,टी शर्ट, शर्ट,शूज व इतर मेन्स स्टायलींग साठी रुबाबची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली शाखा आहे. तरुणाईला त्यांच्या आवडी बजेटनुसार देण्यासाठी या रुबाब शाॅपची संकल्पना सुप्रसिद्ध मराठी उद्योजक सनी भैय्या जाधव यांनी सुरू केली होती.

यावेळी चौके येथील उद्योजक विलास गावडे व परिवाराने सर्वांचे स्वागत केले यावेळी उद्योजक प्रीतम विलास गावडे यांच्या आजी सुलोचना गावडे , शिवसेना पदाधिकारी हरी खोबरेकर,सन्मेष परब,प्रसाद आडवणकर, घुमडे सरपंच दिलीप बिरमोळे , उमेश बिरमोळे, नांदरुख सरपंच दिनेश चव्हाण व बहुपक्षीय नेते,कार्यकर्ते उपस्थित होते.

या उद्घाटन सोहळ्यात प्राईड स्क्वेअर काॅम्प्लेक्सच्या पटांगणात उद्योजक प्रीतम विलास गावडे यांच्या मातोश्री प्रणाली विलास गावडे यांचा वाढदिवसही विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती प्रणाली विलास गावडे यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी मंचावर उद्योजक प्रीतम विलास गावडे व त्यांच्या आजी सुलोचना गावडे ,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, हरी खोबरेकर व इतर गावडे परिवार व मान्यवर उपस्थित होते. उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर म्हणाले की प्रीतम विलास गावडे यांचे एका मालवणी व मराठी युवा उद्योजकाचे हे पाऊल नक्कीच प्रशंसनीय असून त्याला सर्व मालवणवासायिंच्या शुभेच्छा आहेत.

यावेळी उद्योजक प्रीतम विलास गावडे यांचे अनेक युवा मित्रमंडळी व अनुयायी यांच्या सहभागाने प्राईड स्क्वेअरचा परिसर गजबजून गेला होता .

या उद्घाटन सोहळ्यात श्री विनायक गावडे,प्रतिक्षा गावडे,रुपाली गावडे व अन्य गावडे परिवार उपस्थित होते. यावेळी मालवण व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री प्रभूदास आजगांवकर यांनी केले व समस्त विलास गावडे परिवारकडून सर्वांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स