ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली शहरातील दोन विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली शहरातील दोन विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर..!

प्रकाशन: 11 May 2022 02:54 PM
वाचन संख्या 63

नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली माहिती.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली शहरातील जनतेची सातत्याने मागणी असलेली महत्त्वाची दोन विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने कणकवली नगरपंचायत हद्दी मध्ये बिजलीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मराठा मंडळ रोड स्मशानभूमी पर्यंत स्ट्रीट लाईट बसवणे 10 लाख व कणकवली शहरात महाडेश्वर दवाखाना ते नाथ पै नगर गणपती सान्या पर्यंत स्ट्रीट लाईट बसवणे http://localhost/news/public/uploads/20 लाख अशा एकूण 30 लाखाच्या नागरी सहाय्य योजने अंतर्गत विकास कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. अशी माहिती नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.
या संदर्भात गटनेते सुशांत नाईक व नगरसेविका मानसी मुंज यांनी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही विकास कामे मंजुरी संदर्भात मागणी केली होती. या मागणीनंतर नगर विकास मंत्र्यांनी तातडीने कणकवली शहरासाठी 30 लाखांच्या या दोन विकास कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे कणकवली शहरातील नेहमीच वर्दळ व रहदारीचा भाग असलेल्या बिजलीनगर व नाथ पै नगर भागात यामुळे रात्रीच्या वेळी रस्ते झळाळून निघणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स