ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मसुरे कावावाडी येथील पेडणेकर बंधुंनी केला डाॅक्टरांचा सत्कार..!

मसुरे कावावाडी येथील पेडणेकर बंधुंनी केला डाॅक्टरांचा सत्कार..!

प्रकाशन: 11 May 2022 03:03 PM
वाचन संख्या 122

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील पेडणेकर बंधुंनी, कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर विश्वास साठे व डॉक्टर अनिता गिरकर यांनी वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल त्यांचा सन्मान केला.
यापुढील काळात सुद्धा सर्वाना वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी सर्वच डॉक्टर उपलब्ध असतील असे प्रतिपादन शरद पेडणेकर यांनी यावेळी येथे केले.

Article image
Article image


मसुरे कावावाडी येथील पेडणेकर बंधू यांच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. डॉ. विश्वास साठे यांनी सत्काराबद्दल आभार मानले. यावेळी सर्पमित्र रमण पेडणेकर यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मोहन पेडणेकर, दीपक पेडणेकर, गुरुदास पेडणेकर, राजन पेडणेकर, समीर पेडणेकर, सुहास पेडणेकर, तुळशीदास पेडणेकर, काशिनाथ पेडणेकर, गौरव पेडणेकर, परमानंद पेडणेकर, दिनू पेडणेकर, शरद पेडणेकर, यशवंत पेडणेकर, जयवंत पेडणेकर, साईप्रसाद पेडणेकर,रमण पेडणेकर, भूपेश पेडणेकर, चंद्रकांत पेडणेकर, श्रीधर पेडणेकर, किरण पेडणेकर, सिद्धेश पेडणेकर,अमेय पेडणेकर, निखील पेडणेकर, पियुष पेडणेकर, सौ.मधुरा पेडणेकर आदी पेडणेकर बंधू उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार शरद पेडणेकर यांनी केले. सायंकाळी सत्यनारायण महापूजा तसेच रात्री दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक देणे म्हणून येथील पेडणेकर बंधू नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित असतात.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स