ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>कणकवली बस स्थानकासह जिल्ह्यातील सर्वं स्थानकांत धुळीचे साम्राज्य ; डांबरीकरणाची मागणी</em>

<em>कणकवली बस स्थानकासह जिल्ह्यातील सर्वं स्थानकांत धुळीचे साम्राज्य ; डांबरीकरणाची मागणी</em>

प्रकाशन: 09 May 2022 10:05 PM
वाचन संख्या 47

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बस स्थानकासह जिल्ह्यातील सर्वं स्थानके, आगारातील डांबरीकरण गेल्या काही वर्षांत उखडून गेले आहे. आज दिवसभरात अधुन मधुन वावटळी उठत होत्या. त्यातून उठणारी धुळ स्थानकांतील प्रवाशांच्या नाका तोंडात जात असल्याने ते हैराण होत होते. धुळीच्या या साम्राज्यामुळे स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षासह सर्वं दुकानांमध्ये मातीचे थर जमा झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वं स्थानकांसह आगारांमधील भागाचे संपुर्णपणे डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
जिल्ह्यातील सर्वं बस स्थानकांसह आगारांतील भागाचे डांबरीकरण गेल्या काही वर्षांत उखडले गेले आहे. मातीचा थर वर आला आहे. तसेच त्यात खेड्यापाड्यांतून कच्च्या रस्त्यावरून येणार्या एस. टी. गाड्यांवर आणि आत बैठकांवर साचलेल्या मातीची सातत्याने भर पडत असते. वावटळी आल्या नाही तरी गाड्या बस स्थानकात ये जा करीत असताना पाठीमागून मातीची धुळ स्थानक परिसरासह प्रवाशांच्या नाका तोंडात जाते. परिणामी प्रवासी हैराण झाले आहेत. तसेच स्थानकांतील सर्वं दुकानांमध्ये ही धुळ पसरत असल्याने दुकानांतील वस्तू मातीने माखल्या जात आहेत. नियंत्रण कक्षातील कर्मचारीही हैराण झाले आहेत. या धुळीमुळे सर्दी पडसे या आजारांमध्ये वाढ होत आहे. धुळीची अॕलर्जी असलेल्या रुग्णांवर तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत.
तरी कणकवली स्थानकासह जिल्ह्यातील सर्वं बस स्थानके, आगारातील भागाचे डांबरीकरण त्वरित करावे, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून केली जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स