ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवराई रवळनाथ वि. का. स. संस्था हळवल चेअरमन पदी राजू राणे यांची बिनविरोध निवड..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवराई रवळनाथ वि. का. स. संस्था हळवल चेअरमन पदी राजू राणे यांची बिनविरोध निवड..!

प्रकाशन: 09 May 2022 07:54 PM
वाचन संख्या 224

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या शिवराई रवळनाथ वि. का. स. संस्था हळवल चेअरमन (अध्यक्ष) पदी राजू राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तब्बल ५२ वर्षांनी झालेल्या सोसायटी निवडणुकीत गाव पॅनल व शिवसेना पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनलचा एकतर्फी विजय झाला होता. त्यानंतर ही निवड सोसायटी कार्यालयात करण्यात आली. राजू राणे हे मागील १० वर्षे सोसायटी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आपल्या काळात त्यांनी विविध शेती कर्जे उपलब्ध करून तसेच शासनाच्या विविध योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केले होते. सुमारे १० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी प्रकाश घोगळे यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व आपल्या काळात शेतकऱ्यांच्या हिताची कामे करा असे देखील सांगितले. यावेळी सोसायटी निवडणूक निर्णय अधिकारी सुमती ढवळ सचिव प्रज्ञा मेस्त्री सहसचिव शशिकांत तेली, माजी युवा येईना जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, सदस्य जयसिंग राणे, गणेश राणे, संदीप गुरव, आप्पा ठाकूर, सुभाष राणे, पंढरी राणे, मिलिंद जाधव, राजश्री परब, शर्वरी राणे, जनार्दन डोबकर, माजी सरपंच रवी परब, अरुण राणे, सुभाष परब, विजय परब, मारुती सावंत, आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स