ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सावंत इंदरकर मंडळींचा त्रैवार्षिक गोंधळ मोठ्या उत्साहात साजरा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावंत इंदरकर मंडळींचा त्रैवार्षिक गोंधळ मोठ्या उत्साहात साजरा..!

प्रकाशन: 09 May 2022 06:06 PM
वाचन संख्या 43

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील इंदरकर सावंत सहाय्यक समाज मंडळाच्या वतीने श्री देव रवळनाथ मंदिर मसुरे देऊळवाडा येथे आई तुळजाभवानीचा त्रैवार्षिक गोंधळ नुकताच मोठ्या धार्मिक वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. आई उदे उदे उदे ग अंबाबाई च्या नामघोष वातावरण दुमदुमून गेले होते.यावेळी मुंबईकर चाकरमानी,ग्रामीण सर्व सावंत मंडळी, माता भगिनी, माहेर वाशिणी यांनी मातेच्या दर्शनासाठी, नवस बोली,नवस फेण्यासाठीआणि ओट्या भरण्यासाठी गर्दी होती.
भाविक शिस्त बद्ध पद्धत तिने मातेचे दर्शन घेत होते. इंदरकर सावंत मंडळीने गोंधळाचे चोख नियोजन केले होते. मंदिर सभोवती आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे यावेळी आकर्षण ठरले.

यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
या वेळी कुलदेवता मंदिर मेढावाडी मसुरे येथे लोपाचार (होम हवन),देव तरंग काठी पावणाई मंदिर येथून वाजंत्री सहित श्री देव रवळनाथ मंदिर येथे श्री देवी भवानी भेटीसाठी गेली होती,
अग्रपूजा व तुणतुणे पूजा,मांड व गोंधळ विधी, प्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. गोंधळ विधी प्रसंगी रात्र महाप्रसाद वाटप शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना करण्यात आला.यासाठी गावातील देवस्थान प्रमुख प्रभुगावकर बंधू, देवस्थानचे सर्व मानकरी, इंदरकर सावत बंधू, कमिटी सदस्य, प्रशासनाचे अधिकारी, इंदरकर सावंत सहाय्यक समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी,सर्व मानकरी यांनी व मेहनत घेतली. यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार हि रवळनाथ मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मसुरे येथे हो होणार इंदूरकर मंडळींचा असा हा गोंधळ प्रसिद्ध असून हजारो भाविक याला उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स