चाफेड गावठण येथील श्री कुलस्वामिनी मंदिराचा ३९ वा वर्धापन १० मे रोजी…!
शिरगाव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्य चाफेड गावठण येथील अतिशय जागृत आणि नवसाला पावणारे देवस्थान श्री कुलस्वामिनी माता मंदिराचा मंगळवार दि. १० मे रोजी ३९ वा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
या मंदिराच्या समोर विशाल असा अतीपुरातनकालीन वटवृक्ष आहे. या कुलस्वामिनी मंदिरात दरवर्षी होलिकोत्सव,त्रिपुरारी पौर्णिमा,कोजागिरी पौर्णिमा,हरिनाम सप्ताह, नवरात्रोत्सव, असे विविध धार्मिक वार्षिक उत्सव साजरे केले जातात.
या वर्धापनदिनी सकाळी गंगा आणणे,त्यानंतर जलाभिषेक,पूजाअर्चा,महाआरती, दुपारी महाप्रसाद, रात्रौ १० वा. श्री चेंदवणकर गोरे दशावतारी यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री कुलस्वामिनी माता मंदिर देवस्थान समिती तर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)