<em>श्री . जयंतीदेवी सांस्कृतिक , कला क्रीडा मंडळ, पळसंब संस्थेला रजिस्टर मान्यता…!</em>
पळसंब सरपंच श्री . चंद्रकांत विजय गोलतकर यांचे मॅरॅथॉन प्रयत्न यशस्वी…
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्री .जयंतीदेवी सांस्कृतिक , कला क्रीडा मंडळ पळसंब या मंडळाची धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्ग यांच्याकडून रजिस्टर मान्यताप्राप्ती प्रक्रिया आज पूर्ण झाली. तसे नोंदणीचे प्रमाणपत्र धर्मादाय आयुक्तांनी सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्याकडे आज सुपूर्द केले.
पळसंब गावाच्या जडण घडणीत प्रत्येकाच्या सुख दुःखात हे मंडळ सिंहाचा वाटा उचलेल. मुंबईकर चाकरमानी व गांवकरी याची सांगड घालून मंडळ पळसंब गावा मध्ये नक्कीच यशस्वी वाटचाल करून इतिहास रचेल.
मंडळ रजिस्टर नंतर 12 मे चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होईल असे प्रतिपादन पळसंब सरपंच तसेच मंडळाचे सचिव चंद्रकांत गोलतकर यानी केले आहे.
सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या गेल्या आठ महिन्यातील अथक प्रयत्नांची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)