ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मीच मातोश्रीचा दूत असे भासविण्याचा खासदार राऊत यांचा केविलवाणा प्रयत्न

मीच मातोश्रीचा दूत असे भासविण्याचा खासदार राऊत यांचा केविलवाणा प्रयत्न

प्रकाशन: 21 Aug 2021 12:50 PM
वाचन संख्या 60

खासदार विनायक राऊत यांना उपरकर यांचा टोला

कणकवली | उमेश परब : मातोश्रीच्या परवानगीशिवाय खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय उद्योगमंत्री राणेंना स्व. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी शिवसैनिक जाऊ देणार नाही असे वक्तव्य केले. जणू काही मीच मातोश्रीचा दूत असे भासविण्याचा खासदार राऊत यांनी केविलवाणा प्रयत्न केला. भाजपा आमदार नितेश राणे आपले मित्र आहेत असे जगजाहीर पणे सांगल्यामुळे स्वतःच्या इमेजचे डॅमेज कंट्रोल चा हा राऊत यांचा प्रयत्न होता. पण बुंद से गयी वो हौद से आती नही असा टोला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी खासदार राऊत याना लगावला. नितेश राणेंना मित्र म्हटल्यानंतर खासदार राऊत यांचा पूर्वेतिहास कट्टर शिवसैनिकांनीच सोशल मिडियाद्वारे उघड केला. खासदार राऊत स्वतः सिंधुदुर्गात आणि राणेंना अडवणार मुंबईत असे वक्तव्य करून शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडण्याचा राऊत यांचा प्रयत्न होता. जेव्हा उमेश कोरगावकरचे पाय तुटले, वेंगुर्लेत झालेला राडा असू दे किंवा राणेंशी शिवसेनेचा अन्य ठिकाणी झालेला आमनेसामने असो..खासदार राऊत हे नेहमीच लपून राहिले. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनीही सिंधुदुर्गात जाहीर कार्यक्रमात एकेमकांचा उल्लेख सन्माननीय असा केला होता. पण मित्र म्हणून कधीच उल्लेख केला नाही. वेंगुर्लेतील कार्यक्रमात खासदार राऊत यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा नितेश राणेंचा उल्लेख स्वतःचे मित्र म्हणून केला. एकीकडे नारायण राणेंशी टक्कर देणारा मी एकटाच अशी डरकाळी फोडायची आणि दुसरीकडे त्यांचा मुलगा नितेशला मित्र म्हणायचे हा दुटप्पीपणा शिवसैनिकांना रुचलेला नाही, असे उपरकर यावेळी म्हणाले. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ता बिडवाडकर, दत्ताराम अमृते, शरद सावंत संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स