आशा सेविकांना मिळणार एक हजार कोविड प्रोत्साहन भत्ता
ओरोस | प्रतिनिधी : आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जि . प . मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची त्यांच्या दालनात भेट घेत आपल्या मागण्या व समस्यांबाबत चर्चा केली . संघटनेच्या वतीने लेखी निवेदनही देण्यात आले. महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक व आरोग्य कर्मचारी यांच्या जिल्हास्तरीय सर्व मागण्या मंजूर करून आशा सेविकांना दिलासा दिला जाईल. जि. प. फंडातून जिल्ह्यातील ८५० आशा सेवकांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये येत्या आठ दिवसात देण्यात येतील. अशी जि. प . मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाही दिली
आशा सेविकांना दिवाळीपूर्वी ५०० रुपये भाऊबीज भेट देण्यात येईल. आशा व गट प्रवर्तक महिलांना नेहमी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन दरमहा २१ हजार रुपये किमान वेतन मिळावे असे निवेदन शासनाकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन नायर यांनी दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)