मालवणात लिंगेश्वर देऊळाजवळील वटवृक्ष कोसळला...
मालवण | वैभव माणगांवकर : येथील मेढा भागातील श्री देव लिंगेश्वर मंदिर येथील वडाचे झाड उन्मळून पडले.
शुक्रवारी रात्री साडेअकराला हा अपघात घडला.
सदर वडाचे झाड सुमारे दीडशे वर्षे जुनं असल्याचे मेढा वासियांकडून सांगितले गेले आहे. हे झाड कोसळल्यानंतर परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
विजेच्या तारा तुटून पडून आणि विजेचे खांब वाकून नुकसानग्रस्त झाले आहेत.
वाहतुकीवरही याचा थोडाकाळ परिणाम दिसून येत होता परंतु प्रशासनाकडून आता रस्ता मोकळा केला गेला आहे.
महावितरणचे कर्मचारी व मालवण नगरपरिषदेचे कर्मचारी या झाडाला हटविण्यासाठी आणि विज सेवा पूर्ववत करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)