ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गांगो गवळदेव मंदिराचा सहावा वर्धापन दिन ८ मे रोजी…!

गांगो गवळदेव मंदिराचा सहावा वर्धापन दिन ८ मे रोजी…!

प्रकाशन: 06 May 2022 05:44 PM
वाचन संख्या 103

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हळवल गावच्या भाकरवाडी येथे श्री देव गांगो गवळदेव मंदिराचा सहावा वर्धापनदिन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांच्या हाकेला धावणारा आणि संकटी पावणाऱ्या गांगो गवळदेव मंदिराचा ८ मे रोजी सहावा वर्धापन दिन संपन्न होत आहे.

तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसह उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा. असे मंडळाकडून निमंत्रित करण्यात आले आहे.

या सोहळ्यातील ८ मे रोजी होणारे विविध कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

सकाळी ५:०० ते ६:०० काकड आरती,८:०० वा सत्यनारायण महापूजा,१०:०० वा.आरती व तिर्थप्रासाद,११:०० ते १:०० हरिपाठ कीर्तन,(बुवा ह.भ.प.रविकांत ठाकूर)
दुपारी १:०० ते २:०० महाप्रसाद आणि ३:०० ते ८:०० स्थानिकांची सुस्वर भजने अशी कार्यक्रमांची रेलचेल आहे.

रात्री ८:३० वा. महाप्रसाद
व रात्री ९:३० वा. सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला आहे.
रात्री ९:३० वाछता
‘जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस (दांडेली)’ यांचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग होणार असून सर्व भाविकांनी व नाट्यरसिकांनी संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहावे असे मंडळाकडून आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स