ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी श्री बांदेश्वर सेवा सुविधा केंद्राचा पुढाकार कौतुकास्पद : बांदा सरपंच अक्रम ख़ान.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी श्री बांदेश्वर सेवा सुविधा केंद्राचा पुढाकार कौतुकास्पद : बांदा सरपंच अक्रम ख़ान.

प्रकाशन: 06 May 2022 06:27 PM
वाचन संख्या 48

श्री बांदेश्वर सेवा -सुविधा केंद्राच्या मेळाव्याला युवा वर्गाचा उत्तम प्रतिसाद..!

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील श्री बांदेश्वर सेवा -सुविधा केंद्राच्या वतीने बांदा शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला बेरोजगार युवक -युवतींचा भरघोस व उत्तम प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्यात २५० जणांना गोव्यातील २५ हुन अधिक खासगी कंपन्यामध्ये नोकरी देण्यात आली.

गोव्यातील नामांकित कंपन्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक व युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दहावी, बारावी, आयटीआय, पदवी धारक मुले व मुली यांनी मुलाखतीसाठी याठिकाणी गर्दी केली होती. याठिकाणी विविध कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाग्यावर येऊन मुलाखतीतून उमेदवारची निवड केली.

यावेळी गोव्यातील शाम इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीचे संचालक सखाराम गवस, बांदा सरपंच अक्रम ख़ान, शैलेश लाड, सिद्धेश महाजन, सूर्यकांत गाड, सुदर्शन सावंत, जनार्दन सावंत, बांदेश्वर सेवा सुविधा केंद्राचे संचालक निलेश मोरजकर, प्रशांत गवस, समीर परब, सौ. रीना मोरजकर, दिक्षा गवस, प्रथमेश राणे, अक्षय मयेकर, भूषण सावंत, प्रवीण परब, अजित दळवी, सौ. स्वरा परब आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधीत करताना अक्रम ख़ान यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना गोव्यात रोजगार देण्यासाठी बांदेश्वर सेवा सेविधा केंद्राने घेतलेल्या पुढाकाराची विशेष प्रशंसा केली.
युवकांना नोकरीची तथा रोजगाराची नितांत गरज असल्याचे आजच्या मेळाव्यातून निष्पन्न झाले आहे. सखाराम गवस व निलेश मोरजकर यांनी येत्या कळत पावसाळ्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व चंदगड, आजरा तालुक्यात ठिकठिकाणी रोजगार मेळावा घेण्याचे आश्वासन यावेळी दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 331

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स