मातृॠणी जाणीव विचारांचे 'विचारे..!'
हॉटेल व्यावसायिक रवींद्र विचारे व कुटुंबियांच्या वतीने गरजूंना धान्य वितरण..!
कणकवली | बंटी राणे : भूक आणि आई हे भावनीक समीकरण अचूक ओळखून आपल्या आईच्या ७ व्या पुण्यतिथी निमित्त कणकवली येथील हॉटेल व्यावसायिक रवींद्र विचारे व कुटुंबियांच्या वतीने गरजूंना धान्य वितरण तथा वाटप करण्यात आले.
दिवंगत सुरेखा विनोद विचारे यांच्या 7 व्या पुण्यतिथी निमित्त असलदे कणकवली येते स्वस्तिक फाउंडेशन संचालित दिविजा वृद्धाश्रमात हे अन्नधान्य वाटप करण्यात आले
या वेळी राज विचारे,रविंद्र विचारे,सौरभ धुर,वीरेंद्र विचारे, जितेंद्र परब,गौरव मोरे उपस्थित होते.
हाॅटेल व्यावसायिक रवींद्र विचारे यांची ‘आई मला भूक लागली’ या भावनेला सामाजिक स्तरावर मातृॠणाची जाणीव ठेवून केली जाणारी अशी परतफेड ही आदर्शवत असल्याची प्रतिक्रिया समाज अभ्यासकांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)