झोपाळ्यावर झोका घेताना दुर्दैवी अंत..!
ब्युरो न्यूज | वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या वजराट येथे झोपाळ्यावर झोका घेत असताना जमिनीवर कोसळून एका अकरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही दुर्घटना काल सायंकाळच्या सुमारा वजराट येथे घडली. येदील परबावाडीत रहाणार्या कार्तिकी शेखर परब ही झोका घेत असताना तिला जीव गमवावा लागला असे सूत्रांकडून समजते. याप्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.
कु. कार्तिकी ही सायंकाळी झोपाळ्यावर झोका घेत असताना तिचा तोल जाऊन ती खाली पडली. खाली पडल्यावर बेशुद्ध झाल्याने तिचे काका राजेंद्र परब यांनी तिला तात्काळ वेंगुर्ले येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासल्यानंतर ती मयत झाल्याचे सांगितले. याबाबत राजेंद्र परब यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पालकर करीत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)