साळशी केंद्र शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांचे बि डि एस तथा ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत यश..!
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा साळशी न.१ या प्रशालेतून ११ विद्यार्थी
बसले होते. यामध्ये आर्या निलेश गावकर (इयत्ता चौथी) हिने ऑल इंडिया रँक मेरिट लिस्ट मधून गोल्ड मेडल पटकावले.तसेच इयत्ता 3 री तील विराज सुनिल कोदले व कौस्तुभ कैलास गावकर यांनी सिल्वर मेडल पटकावले.
या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख वर्षा लाड मॅडम,प्रशालेचे मुख्याध्यापक गंगाधर कदम , वर्गशिक्षिका स्मिता कोदले, पदवीधर शिक्षक संतोष मराठे, उपशिक्षिका हेमलता जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
विध्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सरपंच, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)