ऑनलाईन गडबडीचा मजुरीकाम करणार्याला बसला फटका..!
खात्यातून http://localhost/news/public/uploads/20 हजाराची रक्कम झाली गायब.
मालवण | ब्युरो न्यूज : ऑनलाईन फसवणुक व गडबडीचे विविध प्रकार ऐकीव असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा पारवाडी येथील रहिवासी, मजुरीकाम करणारे श्री. विठोबा नारायण कदम यांच्या खात्यातून २ मे २०२२ रोजी बँक ऑफ इंडिया आचरा शाखेतील खात्यातुन तब्बल २० हजार रुपये काढले गेले असल्याचा प्रकार घडल्याचे सूत्रांकडून समजते.
श्री. विठोबा कदम हे एटीएम कार्ड किंवा कुठल्याही प्रकारचे चेक बुक, किंवा ऑनलाइन अकाउंटचा वापर करत नसताना त्यांच्या खात्यातील रक्कम दोन वेळा काढली गेली याबाबत मोबाईलवर संदेश आल्यानंतर त्यांना धक्का बसला.
याबाबत विचारणा करण्यासाठी, तक्रार देण्यासाठी कदम यांनी जेष्ठ आचरा नागरिक संघाचे सुरेश ठाकूर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, लक्ष्मण आचरेकर यांच्या समवेत बँक ऑफ इंडिया आचरा शाखेत धाव घेत बँकेच्या शाखाअधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. शाखाअधिकारी यांनी याबाबतची माहिती विभागीय अधिकारी तथा झोनल ऑफिसरना कळवून संबंधित रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लेखी अश्वासन दिले असल्याचे सूत्रांकडून समजते आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)