कणकवलीत शिवसेना आक्रमक..!
नवोदय प्रवेश पात्रता परिक्षेसाठी जिल्ह्या बाहेरुन ‘आणणार्यांवर’ कारवाईची केली मागणी.
एस एम हायस्कूल च्या प्रवेशद्वारावर शिवसेना नेते संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना उप जिल्हाप्रमुख सुजित जाधव , इतर कार्यकर्ते व पदाधिकारी दक्ष..!
कणकवली | प्रतिनिधी : नवोदय विद्यालय प्रवेश पात्रता
परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, अशी
मागणी करत शिवसेना पदाधिकारी व आक्रमक झाले. यात काही बोगस प्रवेशपत्र ही तयार करण्यात आलेली असल्याचा आरोप
करत त्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी
यावेळी करण्यात आली.
मात्र आज जरी असे विद्यार्थी परीक्षेला बसले तरीही त्यांनी मुख्याध्यापकांच्या सही शिक्के आणि पत्र दिल्याशिवाय त्यांचे सिलेक्शन होणार नसल्याचे परीक्षाप्रमुख यांनी स्पष्ट केले.
येथील एस एम हायस्कूल च्या प्रवेशद्वारावर शिवसेना नेते संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना उप जिल्हाप्रमुख सुजित जाधव, सुदाम तेली, बबन मुणगेकर, भूषण परुळेकर, रुपेश आमडोसकर, विलास गुडेकर, रीमेश चव्हाण रुपेश जाधव, रोशन जाधव आदींनी प्रवेश द्वारावर आंदोलन केले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्या, पुढील सिलेक्शन मध्ये मुख्याध्यापकांच्या पत्राशिवाय त्यांचा प्रवेश अंतिम होणार नाही असे सांगितले.
आंदोलन करणाऱ्याशी गणित परीक्षा प्रमुख श्री कुमार व हायस्कूल मुख्याध्यापक श्री कांबळे यांनी ही चर्चा केली. मात्र घेऊन आलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)