ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरवल रतांबेवाडी येथे स्व.शेखर शिरसाट यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरवल रतांबेवाडी येथे स्व.शेखर शिरसाट यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न...!

प्रकाशन: 28 Apr 2022 12:30 PM
वाचन संख्या 133

शिरवल गावच्या विकासासाठी स्व.शेखर शिरसाट यांचे योगदान अतुल्य असल्याचे जिल्हा बॅंक संचालक सुशांत नाईक यांचे प्रतिपादन.

कणकवली | प्रतिनिधी : आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून स्व.शेखर‌ शिरसाट यांनी शिरवल सारख्या ग्रामीण भागात कला, क्रीडा,शैक्षणिक,सांस्कृतिक,आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलाआहे.त्यांचे समाजसेवेचे हे कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक तथा शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले.
सुशांत नाईक हे शिरवल रतांबेवाडी येथे स्व.शेखर शिरसाट यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर रविकांत सावंत, प्रमोद सावंत, दत्तात्रय प्रभूपाटकर, प्रविण तांबे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सुशांत नाईक म्हणाले की, शेखर शिरसाट हे समाजसेवेचा वसा जपणारे आदर्श व्यक्तिमत्व होते.ते‌ सच्चा आणि कट्टर शिवसैनिक होते.शिवसेना ‌कळसुली उपविभाग प्रमुखपदी कार्यरत असताना त्यांनी पदाला न्याय मिळवून देताना पक्षसंघटना वाढीसाठी मेहनत घेतली.आणि निवडणूकीत पक्षाला चांगले मताधिक्य दिले.त्यांच्या निधनाने समाजाचे आणि शिवसेना पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
शिरवल गावच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.त्यांच्या समाजसेवेच्या विचारांचा वारसा स्व.शिरसाट मित्र मंडळ जोपासत असून सलग चार वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या स्मृती जपण्याचे काम स्व.शेखर शिरसाट मित्रमंडळ करीत आहे.निश्चितच समाजासाठी एक वेगळा आदर्श मंडळाने निर्माण केला आहे.असेही श्री.नाईक यावेळी म्हणाले.

यावेळी स्व.शेखर शिरसाट यांच्या प्रतिमेला श्री.सुशांत नाईक यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी प्रमोद नानचे, आनंद प्रभुपाटकर, सुरेश कोदे,शरद शिरसाट,अनिल कुडतरकर,प्रविण कोरगावकर,सिद्धेश राणे, प्रशांत कुडतरकर,अमोल सावंत, श्रीकृष्ण यादव,तुळशीदास कुडतरकर, गुरुप्रसाद वंजारे‌‌,योगेश कोदे,वैभव कोदे, राज प्रभूपाटकर आदी उपस्थित होते.
यावेळी शिरवल विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित संचालक रविकांत सावंत,भिकाजी सावंत, रविकांत तांबे,दयानंद कोदे,विष्णू ताम्हाणेकर, चंद्रकांत कुडतरकर, सुमित्रा कुडतरकर,यांचा सुशांत नाईक यांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सुशांत नाईक यांचा स्व.शेखर शिरसाट मित्र मंडळाच्या वतीने शरद शिरसाट यांनी शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी‌ स्व.शेखर शिरसाट प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स