श्री ओम साई स्वामी समर्थ ट्रस्टचे आदर्शवत कार्य.
मसुरे येथे रक्तदान शिबिरात मोठा प्रतिसाद…
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री ओम साई स्वामी समर्थ ट्रस्ट मसुरे मर्डे वाडी यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजिक कार्यामध्ये सहभाग दर्शविला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव प्रभुगांवकर यांनी केले. प्रारंभी या ट्रस्टचे सेवक कैलासवासी चंदू परब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना बाबुराव प्रभुगांवकर म्हणाले श्री ओम साई स्वामी समर्थ ट्रस्ट मसुरे मर्डे वाडी च्या वतीने प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिरा सारखे समाजाभिमुख उपक्रम हाती घेतलेले असतात. तसेच मोफत अन्नदानाच्या माध्यमातूनही ही संस्था नेहमी कार्यरत असते. अशा या संस्थेचा आदर्श आज सर्वांनी घेणे गरजेचे आहे. यापुढेही ही संस्था अनेक समाजाभिमुख कार्यक्रम हाती घेणार आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित आवळे, अधिपरिचारिका श्रीमती प्रांजली परब, समुपदेशक सुनील वानोळे, नितीन गांवकर, परिचर उल्हास राणे, बच्चू प्रभुगावकर, राजू प्रभुगांवकर, बबलू प्रभुगावकर, समीर प्रभुगावकर, चेतन दळवी, अमित राणे, मिलिंद साळुंके, दिलीप परब, विज्ञान पारकर, जगु चव्हाण, नागेश सावंत, सौरभ मयेकर, ललित परब, दिनेश मसुरकर, प्रथमेश पारकर, भय्यू खोत, स्वप्नील मयेकर, सचिन पाटकर, संजय राणे, हरीश चव्हाण, आणि श्री ओम साई स्वामी समर्थ ट्रस्ट चे सभासद, मर्डे वाडी ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा सत्कार बाबूराव प्रभुगावकर यांच्या शुभहस्ते पार पडला. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सर्वांचे आभार बच्चू प्रभुगावकर यांनी मानले..
कॅप्शन
मर्डेवाडी येथे रक्तदान शिबिर प्रसंगी मोलाचे सहकार्य करणाऱ्या ओरोस रक्त पेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित आवळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करताना बाबुराव प्रभुगावकर सोबत मान्यवर..
छाया जगदीश चव्हाण..
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)