ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
श्री बांदेश्वर कलशारोहण वर्धापनदिन उत्साहात संपन्न ...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्री बांदेश्वर कलशारोहण वर्धापनदिन उत्साहात संपन्न ...!

प्रकाशन: 28 Apr 2022 09:28 AM
वाचन संख्या 53

बांदा | राकेश परब : हजारो भाविकांच्या अलोट गर्दीत बांदा येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिराच्या कलशारोहणाचा “सहावा वर्धापन दिन” सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

Article image
Article image


त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २०१६ साली करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या शुभहस्ते श्री बांदेश्वर मंदिराचे सुवर्ण कलशारोहण झाले होते.तेव्हापासून दरवर्षी चैत्र कृष्ण द्वादशीला या कलशारोहणाचा वर्धापनदिन सोहळा थाटात साजरा होतो.फक्त गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांमुळे केवऴ धार्मिक विधी करुन मर्यादीत स्वरुपात हा कार्यक्रम करण्यात आला होता. यावर्षी पुन्हा एकदा श्री बांदेश्वर दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला.

Article image

बुधवारी  सकाळी श्री गणपती पुजन, देवतास नारळ, विडे अर्पण करुन  गाऱ्हाणे करुन सोहऴ्यास आरंभ झाला.यावेळी संकल्प करुन देव बांदेश्वर मंदिरात लघुरुद्र अनुष्ठान, श्री देवी भुमिका मंदिरात श्रीसुक्त आवर्तन जप अनुष्ठान, श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवर्तन जप अनुष्ठान करण्यात आले.ब्राम्हणवृंदाच्या मंत्रौच्चारात मंदिरातील वातावरण चैतन्यमय बनले होते. दुपारी महाआरती होऊन श्री बांदेश्वर नामाचा जयघोष करुन सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.त्यानंतर महाप्रसादास आरंभ झाला. सायंकाऴी भजन व गायनाचा कार्यक्रम तर
रात्रौ श्रींचा मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहऴ्यासाठी श्री देव बांदेश्वर भुमिका देवस्थान सदस्य तसेच बांदेश्वर भक्त ,भाविक,सेवेकरी,महिला सर्व भक्तीभावाने कार्यरत होते.शशी पित्रे यांच्या आस्वाद कोकमतर्फे सर्व भाविकांसाठी कोकम सरबत वाटप करण्यात आले.या वितरणाचे व्यवस्थापन बांदा पतंजली योग समितीने केले.
मंदिर व परिसरात फुलांची सजावट,आकर्षक रोषणाई व सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स