ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू ...!

पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू ...!

प्रकाशन: 27 Apr 2022 07:15 PM
वाचन संख्या 122

खारेपाटण गावची घटना..

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील बाजारपेठेतून चव्हाटयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पिंपळाच्या एका महाकाय झाडाची मोठी फांदी अंगावर पडल्याने खारेपाटण भैरीआळी येथील ग्रामस्थ श्री. अनंत शांताराम शेलार (वय ५५ वर्षं) यांचा जागीच मृत्यू झाला.

मयत अनंत शांताराम शेलार हे पिंपळाच्या झाडाखालून पायी चालत सदर रस्त्याने जात असताना या रस्त्यावर असणाऱ्या पिंपळाच्या झाडाचा मोठा फांदा अंगावर पडून शेलार यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज बुधवारी दुपारी ३.३० वाजता घडला. तर याच रस्त्यावर बाजूला सुरेश गायकवाड यांच्या शेळ्यांच्या कौलारू गोठयावर देखील पिंपळाच्या झाडाची फांदी पडून त्यांच्या गोठा वजा घराचे नुकसान झाले आहे.अपघात घटनेची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली .
मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह झाडाखालुन बाहेर काढण्यास ग्रामस्थांनी मदत केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स