हळवल नं २ शाळेत 'शाळा पूर्वतयारी' मेळावा संपन्न..
कणकवली | बंटी राणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागामार्फत शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन संपूर्ण राज्यभर करण्यात आले आहे. याच अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा हळवल नं २ मध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशालेत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतीय परंपरेनुसार यथोचित स्वागत करण्यात आले. दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी बंद होत्या त्यामुळे इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाचे नुकसान झाले होते. हेच नुकसान भरून कढण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन शिक्षण विभाग महाराष्ट्र यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
यावेळी हळवल उपसरपंच अरुण राऊळ, केंद्र प्रमुख अनंत राणे, मुख्याध्यापक श्री. सुतार, सहशिक्षक स्वप्नील सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष उमेश परब, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्षा रिया कदम आदींसह ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
या अशा उपक्रमांमधून भावी शालेय पिढी उत्तमपैकी शिक्षण सक्षम होऊन सकारात्मक ऊर्जा घेऊन शाळेत प्रवेश करेल आणि पालक वर्गालाही प्रशालेच्या वातावरणाची व बदलत्या शिक्षण प्रक्रियेची ओळख होईल अशी प्रतिक्रिया हळवल तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री उमेश परब यांनी व उपस्थित मान्यवरांनी माध्यमांना दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)