कोटकामते सरपंचांना अटक ; दोन दिवसांची पोलिस कोठडी.
देवगड | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोटकामते ग्रामपंचायत अपहार प्रकरणी विद्यमान सरपंच सौ सायली प्रदीप पारकर यांना देवगड पोलिसांनी सोमवारी अटक करुन देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २७ एप्रिल पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोटकामते ग्रामपंचायतीच्या 36 लाख 81 हजार एकशे पाच रुपयांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक दीपक केतकर व सरपंच सायली पारकर यांच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात पंचायत समिती विकास विस्तार अधिकारी निलेश जगताप यांनी २२ मार्च रोजी गुन्हा दाखल केला होता त्यानुसार सरपंच पारकर यांनी जिल्हा न्यायालय कडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता असे सूत्रांकडून समजते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)