ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार दीपक केसरकर सहकार्य करतीलच ही खात्री : विष्णू मोंडकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार दीपक केसरकर सहकार्य करतीलच ही खात्री : विष्णू मोंडकर.

प्रकाशन: 25 Apr 2022 01:46 PM
वाचन संख्या 153

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे आमदार दीपक केसरकर यांचे अभिनंदन करुन त्यांना एक निवेदनही दिले गेले आहे.

Article image
आमदार व सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष : श्री .दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी सिंधुरत्न योजनेत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने निवेदन दिले आसून त्यात विविध मागण्यांच्या समावेशाची विनंती करण्यात आली आहे.

चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी ,मत्सव्यवसायिक ,बचतगटातील व्यावसायिकांना यांत्रिकरणाची जोड देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था,रोजगार निर्मितीचे कार्य राज्य सरकारच्या माध्यमातून उभे होत असताना पूर्ण राज्याने पहिले आहे. सदर योजनेनंतर सिंधुरत्न योजनेच्या अध्यक्षपदी आपल्या झालेल्या निवडीबद्दल पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी आमदार दिपक केसरकर यांचे विशेष अभिनंदन करुन हे निवेदन दिले आहे.

पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी कार्य करत असून सदर व्यवसाय वाढीसाठी स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षणासाठी अनुदान योजना राबविणे, नव्याने चालू होणाऱ्या जलक्रीडा,ऍडव्हेंचर प्रकल्प चालू करू इच्छिणाऱ्या व्यवसायिकांसाठी अनुदान योजना राबविणे, टुरिस्ट परवाना लक्झरी कार खरेदी साठी योजना राबविणे, मच्छिमार रापण संघाच्या कावणांचे मच्छिमार कल्चर सेंटर उभारण्यासाठी योजना राबविणे, सध्या चालू असलेल्या होम स्टे,हॉटेल मधील रूम ३ स्टार दर्जाच्या होण्यासाठी प्रतिरूम योजना राबविणे,
पर्यटन व्यावसायिकांना इन्व्हर्टर तसेच जनरेटर खरेदीसाठी योजना राबविणे,
जिल्हा पर्यटन सफारी साठी अद्ययावत तथा सुसज्ज बस उपलब्ध करणे, अपिरिचित पर्यटन स्थळे विकासासाठी योजना राबविणे, सिंधुरत्न योजनेच्या कमिटीत पर्यटन क्षेत्राच्या विकासाठी आवश्यक भूमिका मांडण्यासाठी पर्यटन महासंघाच्या एका व्यक्तीची निवड करणे, अद्यावत पर्यटन माहिती केंद्र साठी योजना राबवणे अशा मुद्द्यांचा समावेश आहे.

आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीवर महासंघाला पूर्ण विश्वास असून ते महासंघाच्या पर्यटन वाढीसाठी केलेल्या विनंतिचा तथा निवेदनाचा विचार करुन संपूर्ण सहकार्य ही खात्री असल्याचेही श्री विष्णू मोंडकर व सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने व्यक्त केली आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स