भिरवंडे सोसायटीवर सर्व 13 जागांवर शिवसेनेचे वर्चस्व..!
कणकवली | प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातील ‘भिरवंडे विविध कार्यकारी सोसायटीच्या’ पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी 10 जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये सर्वच्या सर्व 10 जागांवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. यापूर्वी शिवसेनेच्या 3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे सर्व 13 जागा जिंकत सोसायटीवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना नेते सतीश सावंत यांची रणनीत यशस्वी झाली.
भिरवंडे सोसायटीच्या निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरस होती. शिवसेनाप्रणित शेतकरी समृध्दी गाव पॅनेल विरूध्द भाजप प्रणित श्री देव रामेश्वर दिर्बादेवी गाव पॅनेल यांच्यात लढत झाली. विजयी झालेल्या शिवसेना प्रणित पॅनेलच्या उमेदवारांमध्ये प्रकाश लक्ष्मण घाडीगावकर 260 मते, चंद्रशेखर अनंत सावंत 257 मते, बेनी पेद्रू डिसोजा 254 मते, अरविंद मधुसूदन सावंत 255 मते, तुषार भगवान सावंत 254 मते, मंगेश बळीराम सावंत 252 मते, प्रदीप तुकाराम सावंत 250 मते, रमेश देऊ सावंत 259 मते, महिला गटातून दीपा पंढरी सावंत 259 मते, सौ. स्मिता प्रदीप सावंत 256 मते हे उमेदवार विजयी झाले आहेत.तर यापूर्वी अनुसूचित जाती गटातून संजय सुभाष कदम, इतर मागास गटातून सदानंद अनंत मेस्त्री आणि भटक्या विमुक्त जमाती गटातून सिद्धेश शामू पटकारे बिनविरोध निवडून आले होते. सर्व 13 ही उमेदवारांचे शिवसेना नेते सतीश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, माजी पं.स. सदस्य मंगेश सावंत व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)