ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
हळवल शिवडाव रस्त्यावर डंपर पलटला…!

हळवल शिवडाव रस्त्यावर डंपर पलटला…!

प्रकाशन: 24 Apr 2022 02:58 PM
वाचन संख्या 143

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हळवल शिवडाव मुख्य मार्गावर हळवल ग्रामपंचायतच्या पुढे असलेल्या चढावा दरम्यान कणकवलीच्या दिशेने येणारा एक डंपर पलटी झाला.
आज सकाळी दहाच्या सुमाराला ही घटना घडली.

Article image


खडीने भरलेला डंपर पलटी झाल्याने डंपर चालकाला किरकोळ दुखापत झाली. यादरम्यान कणकवली हळवल शिवडाव रस्त्यावर दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान हळवल गावचे माजी पोलीस पाटील प्रकाश गुरव, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन राणे, शिवा राणे ,संदेश राणे ,दामू सावंत, ए.पी. सावंत, बाबू राणे, भाई तावडे ,शेष राणे ,सुभाष राणे, प्रफुल राणे तसेच मार्गावरून प्रवास करणार्या काही सजग ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली .

आता जेसीबीच्या सहाय्याने हा पलटलेला डंपर रस्त्यावरील पसरलेली खडी हटवून बाजुला काढण्यात आला आहे.
यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत नंतर झाली आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स