ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आजगांव येथे साहित्य प्रेरणा कट्ट्याची अठरावी सभा संपन्न..!

आजगांव येथे साहित्य प्रेरणा कट्ट्याची अठरावी सभा संपन्न..!

प्रकाशन: 24 Apr 2022 02:36 PM
वाचन संख्या 65

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगांव येथे साहित्य प्रेरणा कट्ट्ची अठरावी सभा संपन्न झाली. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रारंभी मराठी ग्रंथालय आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. मधुकर घारपुरे यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. त्यानंतर डाॅ. सुधाकर ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली साहित्य कट्टयाची सभा संपन्न झाली.

सभेच्या प्रारंभी कट्ट्याचे संघटक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचा परिचय करुन दिला.

सभेच्या प्रारंभी कट्ट्याचे संघटक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचा परिचय करून दिला.

डाॅ. सुधाकर ठाकूर यांनी पुस्तकां विषयीच्या आपल्या तीन कविता वाचून दाखवल्या. तसेच “आपण नियमित रोज चार-पाच तास वाचन-लेखन करतो. ग्रेस, व्यंकटेश माडगूळकर, आरती प्रभू हे माझे आवडते साहित्यिक असून मी शक्यतो वाचनालयातीलच पुस्तके वाचतो. कारण ती परत करायची असल्याने लवकर वाचून होतात,” असे सांगून त्यांनी पुस्तक वाचनाचे अनेक कंगोरे उलगडून दाखवले. डाॅ. घारपुरे यांनीही आपले पुस्तक वाचना विषयीचे मत मांडले. तसेच आपल्या ‘प्रेम अक्षरावर करा ‘ या कवितेच्या प्रती उपस्थित साहित्य प्रेमींना दिल्या.

‘सभोवतालकार’ कवी विनय सौदागर यांनी त्यांच्या जीवनातील पुस्तकांचे महत्व सर्वांना सांगितले आणि त्यासाठी मार्गदर्शन केलेल्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

या सभेला रामचंद्र झाटये,अनिल निखार्गे,एकनाथ शेटकर ,चंद्रकांत गवंडे ,प्रकाश वराडकर ,ईश्वर थडके ,रविंद्र अटरे ,दत्तगुरू कांबळी, सोमा गावडे ,स्वप्नील वेंगुर्लेकर, एस्. आर. मावळंकर,सोमनाथ गावडे, श्रीपाद सामंत ,अंकुश आजगावकर, सौ.प्रिया आजगावकर, सौ.अंकिता वाडकर, सौ.देवयानी आजगावकर, सौ.मीरा आपटे, सौ.अनिता सौदागर , सौ.मीरा ठाकूर ,शुभंकर ठाकूर कु.मृणाल ठाकूर असे साहित्य प्रेमी उपस्थित होते.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स