ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
श्री देव रवळनाथ शिवराई मंदिर हळवलचा सहावा वर्धापनदिन होणार थाटात संपन्न…!

श्री देव रवळनाथ शिवराई मंदिर हळवलचा सहावा वर्धापनदिन होणार थाटात संपन्न…!

प्रकाशन: 22 Apr 2022 01:26 PM
वाचन संख्या 151

श्री देव रवळनाथ विश्वस्त मंडळाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण..

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या हळवल गावची ग्रामदेवता श्री शिवराई रवळनाथ मंदिराचा सहावा वर्धापनदिन ५ मे २०२२ ला गुरुवारी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने होणाऱ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमास सहकुटुंब मित्रपरिवारासह उपस्थित रहाण्याचे आग्रहाचे निमंत्रण श्री देव रवळनाथ विश्वस्त मंडळ हळवल यांनी केले आहे.

Article image

वर्धापनदिनाचे औचित्य साधून गुरुवार ,दि.५ मे २०२२ रोजी सकाळी ५:३० वा काकड आरती, सकाळी ७ वा देवांची पुजा व अभिषेक, सकाळी १० वा सामुहिक आरती, सकाळी ११ वा स्थानिक भजने, दुपारी १ वा महाप्रसाद, दुपारी ३ वा खेळ पैठणीचा, सायंकाळी ६ वा वारकरी सांप्रदाय हळवल यांचे हरिपाठ, सायं ७ वा प्रदक्षिणा, रात्रौ ८ वा. महाप्रसाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण रात्रौ ८:३० वा हौशी दशावतार नाट्य मंडळ, हळवल यांचे दशावतार नाटक व रात्रौ ११ वा. गुरुकृपा दशावतार नाट्यमंडळ हळवल यांचे दशावतार नाटक असणार आहे.

श्री देव रवळनाथ शिवराई मंदिर, हळवल इथे हा सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती आयोजक श्री देव रवळनाथ विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स