ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
भटके-विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला मिटकरांचा निषेध..!

भटके-विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला मिटकरांचा निषेध..!

प्रकाशन: 22 Apr 2022 03:03 PM
वाचन संख्या 68

तिथे हास्यकल्लोळ करणाऱ्या जयंत पाटील,धनंजय मुंडे यांनीही माफी मागावी अशी मागणी..!

वैभववाडी | नवलराज काळे : सांगलीत अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची सांगली येथील सभेत खिल्ली उडवली. मिटकरी यांच्या खिल्लीवर हास्यकल्लोळ करणाऱ्या जयंत पाटील,धनंजय मुंडे यांनी ब्राह्मण समाजासहित हिंदू धर्माची जाहीर माफी मागावी अशी मागणी भटके-विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.

नरेंद्र पवार आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणतात,
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदू संस्कृतीची, ब्राम्हण समाजाची खिल्ली उडवतात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे त्यावर खळखळून हसत दाद देत आहेत, हे दुर्दैवी आहे. राष्ट्रवादी तुष्टीकरणाला खतपाणी घालत आहे. राष्ट्रवादीची भूमिका नेमकी कुणाच्या विरोधात आहे, जो ब्राम्हण समाज अनेक वर्षे पौरोहित्य करतो त्यांची जाहीर सभेत चेष्टा आणि टिंगल करून सनातन हिंदू संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कन्यादान हा सनातन धर्मात पवित्र विधी आहे, जो विधी प्रत्येक हिंदू कन्येच्या विवाहावेळी करत असतो.
राष्ट्रवादीच्या या तुष्टीकरणीय भूमिकेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी समस्त ब्राम्हण समाज आणि हिंदूंची माफी मागितली पाहिजे, आम्ही संस्कृतीची टिंगलटवाळी सहन करणार नाही. राष्ट्रवादीने त्यांना आवर घातला पाहिजे. अशा भाषेत भाजपचे भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राष्ट्रवादीला सुनावले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स