श्रीमती कल्पना ढोके यांचे निधन....!
देवगड | प्रतिनिधी : जामसंडे-कट्टा येथील रहिवासी श्रीमती कल्पना मधुकर ढोके (८३ वर्षे) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. दूरदृष्टीची जाण असलेले एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून गावातील धार्मिक कार्यात हिरारीने त्या सक्रिय सहभाग घेत असत.संपूर्ण गावात त्या ‘ताई’ म्हणून परिचित होत्या.गेली अनेक वर्षे श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात त्या हळदी कुंकू समारंभ राबवत होत्या. त्यामुळे त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माजी मुख्याध्यापक कै. मधुकर भगवान ढोके यांच्या त्या पत्नी होत.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे,मुली,जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)