नागवे संरपंचांसह अनेक शिवसैनिक भाजपात..!
आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव शिवसैनिकांवर वाढत असल्यानेच
भाजपात प्रवेशाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याची भाजपा कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया..!
कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा आमदार नितेश राणे यांची कार्यपद्धती दिवसेंदिवस प्रभावी ठरत आहे.त्यामुळे कणकवली,देवगड,वैभववाडी या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत अशी प्रतिक्रिया बहुसंख्य भाजपा कार्यकर्त्यांची आहे.
आज नागवे गावचे सरपंच नारायण आर्डेकर यांनी असंख्य शिवसैनिकांसह भाजपात प्रवेश केला.
कणकवलीत ओमगणेश निवास्थांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.यावेळी सरपंच नारायण आर्डेकर,अमेय आर्डेकर, स्वप्नील पाताडे,राकेश सुतार, अभिजीत पाताडे,रविकिरण नानचे,गोट्या सुतार,प्रथमेश मोरये, प्रतिक बागवे, ओंकार सुतार, रसिक मोर्ये, जयशआरेकर, महेश आरेकर, प्रकाश सावंत,यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत,तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,माजी उपसभापती सुरेश ढवळ,युवक अध्यक्ष गणेश तळगांवकर,फोंडघाट सरपंच संतोष आंग्रे,महेंद्र कुडाळकर, सचिन खेडेकर, सिद्धार्थ जाधव,विजय मेस्त्री आदी सह पदाधिकारी उपस्थितीत होते.नागवे गावच्या विकासासाठी राणे कुटुंबियांचेच नेतूत्व हवे. भारतीय जनता पार्टीची विचारधारा घेऊन गावात कार्य करणार असल्याचे यावेळी सरपंच आर्डेकर यांनी सांगितले.या प्रवेशाने शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)