ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गणपती..अंगारक आणि मंगलमूर्ती…!

गणपती..अंगारक आणि मंगलमूर्ती…!

प्रकाशन: 19 Apr 2022 11:31 AM
वाचन संख्या 173

मालवण | विशेष : श्री गणेशांना स्मरुन साजर्या केल्या जाणार्या विशेष दिवसांपैकी एक दिवस आहे आजची अंगारकी चतुर्थी.
मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, ‘अंगारक’ या भारद्वाज ऋषींच्या मुलाने कठोर तप करून श्री गणेशजींना प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नांव ‘अंगारक’ हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता.

या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशातला मंगळ ग्रह असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले आणि म्हणून या मूर्तीला ‘मंगलमूर्ती’ असे नांव मिळाले.

कथेतील अंगारक किंवा मंगळ हा आजच्या पिढीत हरएक बालक बालिका. श्री गणेशाचे प्रसन्न होणे म्हणजे बालकांची कौशल्य विकासाची धडपड ही क्रोधीत न होता त्याला घडवून एखादे स्थान देणे हे ‘मंगल’ कार्य आहे.

शिक्षक,प्रशिक्षक व पालक. हे तिघेही मुलांसाठी त्यांचे ‘गणपती’ असतात. दिवसागणिक साधन व सोयींची व्याप्ती वाढत असल्याने ‘तयार निकाल’ हा तसा जलद मिळतो. यामध्ये कौशल्य क्षमता थोडी बदलते पण ती कमी झाली असे समजून पालक,शिक्षक व प्रशिक्षक यांनी स्वतःच्या बालपणाची तुलना या पिढीशी करणे इष्ट नाही.
तिथेच श्री गणपतींची दृष्टी,कान आणि स्थीर चित्त यांची गरज पालक ,शिक्षक व प्रशिक्षक यांना असते.

‘छडी लागे छम् छम् ..विद्या येई घम् घमू ..’, असे हात उचलून किंवा शारिरीक दंडात्मक शिक्षा करुन ‘विद्या’ प्राप्त झाली अशी भाबडी समजूत होते. विद्या म्हणजे कौशल्य जगायचा आनंद असतो हे कळणे महत्वाचे….आणि तो आनंद असेल तरच विद्या ‘प्रसन्न’ झाली आहे असे समजता येते. कारण ‘विद्या विनयेन् शोभते’ हे सुभाषित तथा हा सुविचार देणार्या व घेणार्या दोघांनाही समानच लागू आहे.

अंगारक किंवा मंगळा प्रमाणे पद्धतशीर असा सर्व विद्या तथा कौशल्याचा श्री गणेशा होऊन प्रत्येक बालक बालिकेला ‘मंगल स्थान’ आणि त्यांच्या पालक,शिक्षक व प्रशिक्षकांना त्यांचे ‘गणपती’ असण्याचे व्रत ही सामाजीक आनंदाची अंगारकी चतुर्थिची संपन्नता ठरावी याच संकल्पाच्या सदिच्छा.

प्रत्येक शिक्षार्थिची ग्रहणक्षमता कमी जास्ती असू शकते किंवा त्याचा कालावधी भीन्न असू शकतो हा स्विकार हेच अंगारकीचे सामाजिक व्रत.

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स