ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
संपन्नता शोधक...!

संपन्नता शोधक...!

प्रकाशन: 18 Apr 2022 01:29 PM
वाचन संख्या 112

मालवण | आपली सिंधुनगरी न्यूज टीम : ग्रामीण भागातून जगभर भिरभिरत्या दृष्टीचे जगणे म्हणजे चिंदर गावचा युवक… विवेक परब..!

थेट नांवच आधी सांगितले कारण विवेकही अघळ पघळ नसतो. ग्रामीण भागातून संपन्नता शोधताना त्याला त्याची मर्यादा ठाऊक असते. स्वतःच्या अस्तितत्वापेक्षा आहे ते अस्तित्व संपन्न राखण्याचा एकहाती आणि एकजीवी प्रयत्न तो करतो.

दत्तभक्तिची आस ही संपन्नतेचा प्रयत्नच असतो. त्रिगुणात्मकतेच्या स्विकाराइतकी दुसरी संपन्नता नाही हे तो शब्दशः जाणत नसेल पण तो तसा आहे…स्विकारुन चालणारा.
स्विकारेपर्यंतची तगमग तो दाखवत नाही म्हणून तो त्याच्या नावालाही जागतो..’विवेक..!’

भरपूर विचार आणि प्रचंड शब्दसंपन्न असलेल्या विवेकला मार्गदर्शन करुन घ्यायची एक दुर्मिळ इच्छाशक्ती आहे. साहित्यिक,विचारवंत,प्रशासकीय अधिकारी, कृषीतज्ञ अशा माणसांच्या मेळ्यात रमून त्याला संपन्न व्हायचे असते. सृजनाचा ध्यास त्याला तितकासा नसला तरिही सृजनात्मक काय आहे याची रचना तो जाणतो आणि सृजनत्वाचा आदरही करतो.
त्याच्याकडे जवळपास सगळ्याच गोष्टींचे भांडार आहे आणि त्याचा ‘बाजार’ करता येत नाही ही म्हणली तर चांगली व व्यावहारिक जगात त्याला न जमलेली गोष्ट आहे…खंत नाही तर फक्त वास्तव..!

जगरहाटीतील सच्चेपणापणा इतकीच ‘अच्छेपण’ही काळाची गरज असल्याचे विवेक जाणतो. ते अच्छेपण नेहमीच सर्वांना खूश ठेवू शकणार नाही हा संपन्न विचारही त्याने केलेलाच असतो .

काळ,काम व वेगाच्या समिकरणांमध्ये ‘विवेक’जपणे हेच एक माणुस ‘असणे’असते आणि विवेक तो माणुस आहे.

एक विचारी धडपड्या, मुक्त लेखक म्हणून ओळखला जाणार्या विवेकची आता एक पत्रकार म्हणून स्थीर वाटचाल सुरु झाली आहे.
त्या वाटचालीसाठी आणि त्याच्यातील विवेकाच्या उत्तमोत्तम व उत्तरोत्तर संपन्नतेसाठी त्याला वाढदिवस शुभचिंतन.

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल टीम.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स