ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पालापाचोळ्यात सापडली मोटारसायकल…!

पालापाचोळ्यात सापडली मोटारसायकल…!

प्रकाशन: 18 Apr 2022 12:22 PM
वाचन संख्या 118

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या खांबाळे साळुंखेवाडी येथील संजय साळुंखे यांची चोरीला गेलेली दुचाकी सापडली. आचिर्णे रासाई मंदिरानजीक रस्त्याच्या कडेला गटारात पालापाचोळ्यात ही दुचाकी दडवून ठेवली होती. शुक्रवारी रात्री ही गाडी चोरीला गेली होती.

तालुक्यात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी सात दुकाने व दोन घरे फोडली होती. तसेच दोन दुचाकी देखील चोरल्या होत्या. त्यापैकी खांबाळे येथील संजय साळुंखे यांची घराच्या अंगणात असलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली होती. ३५ वर्षापूर्वीची आर एक्स १०० ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली होती. शनिवारी याबाबत संजय साळुंखे यांनी पोलीसांत तक्रार दिली. त्यानंतर त्या गाडीची सर्वत्र शोधाशोध सुरू होती. अखेर आज सकाळी ही गाडी आचिर्णे येथील रासाई मंदिरानजीक रस्त्याकडेला गटारात सापडली. या गाडीवर पालापाचोळा टाकून झाकून ठेवली होती. त्यामुळे साळुंखे कुटुंबांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तालुक्यातून शुक्रवारी चोरीला गेलेल्या दोन दुचाकीपैकी एक दुचाकी सापडली. मात्र दुसरी शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे. तसेच चोरट्यांनी खांबाळे येथून चोरलेली दुचाकी नेमकी याठिकाणी का ठेवली होती याचा शोध घेणे देखील गरजेचे आहे. यातून काही धागेदोरे पोलीसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.

(फोटो : प्रातिनिधिक गुगल संग्रहीत)

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स