<em>मायलेक चमकले राज्यस्तरीय स्पर्धेत ..!</em>
बांदा | राकेश परब : कोल्हापूर येथील शिवाजी भोसले प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने बाल गटातून द्वितीय क्रमांक तसेच त्याची आई गौरी नितीन बांदेकर यांनी खुल्या गटातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या मायलेकाच्या जोडीने
यापूर्वीही अनेक गीत गायन, वक्तृत्व, कथाकथन, पोवाडा स्पर्धांमध्ये बरीच बक्षिसे पटकावली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल बांदा केंद्रशाळेतील समस्त शिक्षक वृंद ,शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सरपंच अक्रम खान यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. विविध स्तरांतून या माता-पुत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)