ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
काळसे येथे बीएसएनएल टॉवरचे उद्घाटन तर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन संपन्न....!

काळसे येथे बीएसएनएल टॉवरचे उद्घाटन तर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन संपन्न....!

प्रकाशन: 15 Apr 2022 06:59 PM
वाचन संख्या 160

खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकास कामे.

चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मार्गावरील काळसे गावात मोबाईल रेंज नसल्याची समस्या होती. या काळसे गावात खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून बी.एस.एन.एल. मोबाईल टॉवर उभारण्यात आला असून आज या टॉवरचे लोकार्पण खासदार विनायक राऊत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी तहसीलदार श्री शरद गोसावी यांच्या हस्ते पार पडले. त्यामुळे गावातील रेंज ची समस्या आता दूर झाली आहे.
आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून काळसे गोसावीवाडी श्री.सिद्धमहापुरुष मंदिर नजीक संरक्षक भिंतीसाठी ६ लाख रु. चा निधी मंजूर केला असून त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी माजी जि.प.सदस्य नागेंद्र परब, माजी जी.प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना विभागप्रमुख अण्णा गुराम, सुनील सावंत, बाळ महाभोज,यशवंत भोजने, बाबू टेंबुलकर, संदीप सावंत, अनिल प्रभू, जयवंत केळुसकर, सरपंच केशव सावंत, राजन प्रभू, उमेश प्रभू, नंदू प्रभू, जमिन मालक संतोष सावंत , सुधीर देशमुख बीएसएनएल उपमंडल अभियंता सावंतवाडी , प्रवीण कवडे उपमंडल अभियंता मालवण , प्रकाश सरगर ज्युनिअर इंजिनिअर, तंत्रज्ञ ऱाजा सावंत , केशव काराणे, शिवनंदन प्रभु , योगेश राऊळ , अमोल गोसावी , मधुकर मालवणकर , ज्ञानेश्वर सातार्डेकर, दत्तराज साळसकर , लिलाधर नाईक, संजय नाईक , अजित मालवणकर , मनोज मालवणकर, राजेंद्र गोसावी , आनंद गोसावी , प्रभाकर गोसावी , महेश गोसावी , मंगेश गोसावी , रामचंद्र गोसावी , संजय गोसावी , विजय गोसावी , सहदेव गोसावी, शशांक गोसावी. आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स