ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गाबीत चषक 2022 क्रिकेट स्पर्धेदरम्यान मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर यांचा वाढदिवस झाला साजरा…!

गाबीत चषक 2022 क्रिकेट स्पर्धेदरम्यान मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर यांचा वाढदिवस झाला साजरा…!

प्रकाशन: 14 Apr 2022 04:46 PM
वाचन संख्या 57

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण दांडी येथे झालझुल क्रिकेट मैदानावर एकेश्वर मित्रमंडळाची गाबीत चषक http://localhost/news/public/uploads/2022 क्रिकेट स्पर्धा सुरु आहे.
आज स्पर्धेच्या चौथ्या दिवशी माजी आमदार आणि मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर यांचा वाढदिवस तिथे साजरा करण्यात आला.
यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी गाबीत बाॅईज विरुद्ध महापुरुष रेवतळे मालवण या सामन्याचा आस्वाद देखिल घेतला.
या सोहळ्याला मालवण,दांडी व परिसरातील गाबीत बांधवांची मैदानावर मोठी उपस्थिती होती.गाबीत समाजातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनेक युवक,युवतींचा व सामाजिक,क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणार्या व्यक्तिंचा सन्मान आमदार परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित प्रेक्षक व दांडी वरील युवा वर्गातर्फे दिवंगत क्रिकेटपटू तसेच एक सामाजिक व्यक्तिमत्व श्री निलेश केळुस्कर ऊर्फ ढोमसो यांच्या स्मृतीलाही उजाळा देण्यात आला.

चंद्रशेखर उपरकर, प्रशांत उपरकर,सन्मेष परब,संजू धुरी,सुनिल धुरी राजेश बांदकर, जयदेव लोणे,नितीन पराडकर ;पत्रकार महेंद्र पराडकर,रश्मीन रोगे; आणि गाबित समाजाचे आघाडीचे समाजसेवक व युवा संघटक तथा उद्योजक अन्वय प्रभू,मंगेश धुरी, नारायण धुरी,हेमंत मेस्त तसेच दांडी व मालवणमधील तमाम गाबीत बांधव उपस्थित होते.

उपस्थित संघांच्या खेळाडू,आयोजक यांनी परशुराम उपरकर यांचा वाढदिवस त्यांच्या हस्ते केक कापून साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांनी गाबीत समाजाला मार्गदर्शन करुन संबोधीत केले आणि गाबीत समाजाच्या समस्यांसाठी व प्रगतीसाठी पक्षांची पादत्राणे बाहेर काढून ठेवून देऊन काम करायचे आवाहन केले.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी गाबीत समाजाला जेंव्हा गरज भासेल तेंव्हा तेंव्हा हा माजी आमदार सोबत असेलच असे आश्वासन दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स