ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण नगरपरिषद व कुडाळ पंचायतसाठी पुन्हा एकदा २ कोटी ८८ लाख रु निधी मंजूर..!

मालवण नगरपरिषद व कुडाळ पंचायतसाठी पुन्हा एकदा २ कोटी ८८ लाख रु निधी मंजूर..!

प्रकाशन: 14 Apr 2022 11:38 AM
वाचन संख्या 49

आम.वैभव नाईकांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे केलेल्या पाठपुराव्याला यश..!

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा नगरविकास विभागामार्फत कुडाळ नगरपंचायत व मालवण नगरपरिषदेसाठी एकूण २ कोटी ८८ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजेनेअंतर्गत कुडाळ नगरपंचायतीसाठी ५३ लाख तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मालवण नगरपरिषदेसाठी २ कोटी ३५ लाख रु. निधी विविध कामांसाठी मंजूर झाला आहे. याबाबतचे शासन निर्णय १२ एप्रिल २०२२ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

Article image

यामध्ये कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कुडाळ बाजारपेठ वाचनालय ते उदय नाडकर्णी घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १३ लाख रु, कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी (पशुवैद्यकीय चिकित्सालय ) समोर गटार बांधणे व आरसीसी लाद्या टाकणे, तसेच कुडाळ क्रिडांगण येथे समालोचनासाठी शेड बांधणे यासाठी निधी ४० लाख, हि कामे मंजूर करण्यात आली आहेत.

मालवण नगरपरिषदेमध्ये मत्स्यालय प्रकल्प उभारणी करणे निधी १ कोटी २० लाख, मालवण नगरपरिषद मच्छीमार्केट येथे सुसज्ज प्रसाधनगृह बांधणे निधी २५ लाख, मालवण भरड पे पार्क येथे विकसित करण्यात येणाऱ्या वाहनतळाच्या जागेत सुसज्ज चेंजिंग रूम्स व आवश्यक सोयी सुविधा तयार करणे २० लाख, रेवतळे शाळा जंक्शन ते मांजरेकर घर ते गाड घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे व अंतर्गत गटार बांधकाम करणे ३० लाख, मालवण समुद्र किनाऱ्यावर पर्यटक सुविधांकरिता गझीबो उभारणे ४० लाख असे एकूण २ कोटी ८८ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे. मागणी केल्यानंतर ना. एकनाथ शिंदे यांनी तातडीने हा निधी दिल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Article image
Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स