मळगांवच्या रामदास उर्फ राहुल राजन राऊळ याची राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड..!
बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील मळगांव येथील रामदास उर्फ राहुल राजन राऊळ याने ज्यूनियर मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेतील ६५ किलो वजनी गटात टॉप फाइव मध्ये स्थान मिळवले आहे. तसेच राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये त्याची निवड झाली आहे. या स्पर्धेत एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले होते.
त्याच्या या यशाने मळगांव बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान गर्वाने उंचावली आहे. अत्यंत प्रतिकूल स्थितीतून मार्ग काढत त्याने हा पल्ला गाठला आहे. नुकत्याच उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या जूनियर मिस्टर इंडिया आग्रा दिल्ली चॅम्पियनशिपमध्ये आपले पहिल्या पाच मधील स्थान निश्चित केले. ही स्पर्धा रविवारी दहा एप्रिल ला पार पडली. त्याच्या या यशाबद्दल त्याची प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)