आमदार डाॅ. राजन साळवी यांच्या शिफारशीनुसार ८ नूतन इमारत बांधणीसाठी निधी मंजूर....!
कणकवली | ब्युरो न्यूज : शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेल्या माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणे योजने अंतर्गत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांच्या शिफारशीनुसार राजापूर तालुक्यातील वाडापेठ, देवीहसोळं, तारळ, कळसवली तसेच लांजा तालुक्यातील वाकेड, भडे, कोलें, हार्दखळे ह्या ग्रामपंचायतीच्या नूतन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून मतदार संघातील ह्या ८ ग्रामपंचायतीच्या इमारती बांधण्यासाठी लागणार निधीचा प्रश्न सुटला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)