ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
बार्टीच्या निबंध स्पर्धेत श्रद्धा पाटकर यांचा निबंध ठरला अव्वल..!

बार्टीच्या निबंध स्पर्धेत श्रद्धा पाटकर यांचा निबंध ठरला अव्वल..!

प्रकाशन: 09 Apr 2022 11:53 AM
वाचन संख्या 238

‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रकारितेतील योगदान’ विषयावर लिहीलेला निबंध...

कणकवली | प्रतिनिधी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निबंध स्पर्धेत कणकवली येथील श्रद्धा सतीश पाटकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कुडाळ येथील शीतल किरण कदम याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून मालवणच्या माधवी लीलाधर तिरोडकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

Article image
Article image

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रकारितेतील योगदान असा निबंध स्पर्धेचा विषय होता.स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निबंध स्पर्धेला मिळाला. स्पर्धेचे परीक्षण कॉलेज मालवणचे प्राध्यापक नागेश कदम यांनी केली. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व समता दूतांनी मेहनत घेतली. याबाबत सहभागी व यशस्वी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स