ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आचरा येथे रामनवमी निमित्त जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धा...!

आचरा येथे रामनवमी निमित्त जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धा...!

प्रकाशन: 08 Apr 2022 10:55 PM
वाचन संख्या 57

श्री अभय भोसले मित्रमंडळाचे आयोजन…. !

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथे रामनवमी उत्सवा निमित्त ‘श्री अभय भोसले मित्रमंडळ आचरा’ यांच्यावतीने बुधवार दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी आचरा रामेश्वर मंदिर नजिकच्या मैदानावर दिवस- रात्र जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक पारितोषिक ७००० व चषक, द्वितीय क्रमांक ५००० चषक, तृतीय क्रमांक-२०००, चतुर्थ क्रमांक – २००० सहभागी सर्व संघाना रोख रुपये १००० मानधन म्हणुन दिले जातील याची नोंद संघानी घ्यायची आहे.
स्पर्धा रामनवमी निमित्त असल्याने ठीक ०६ वाजता सुरू होईल असे सर्व संघांना सूचीत करण्यात आले असून रात्री जेवणाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आलेली आहे.

आपल्या संघाची नाव नोंदणी श्री सदा पुजारे (मोबाईल नंबर- ९५४५०५५२४६ ) किंवा श्री सुरेंद्र(अण्णा)सकपाळ मोबाईल (नंबर- ९४२३३०१५८४ फोन नंबर- ०२३६५-२४६०९९) या नंबरवर १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत करायची आहेत.

संघ कमी आल्यास साखळी पद्धतीने सामने चालु केले जातील सामने चालु झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही तरी जास्तीत जास्त संघानी सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन सदर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स