ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन....!

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन....!

प्रकाशन: 08 Apr 2022 11:17 PM
वाचन संख्या 191

१० ते १४ एप्रिल पर्यंत चालणार कार्यक्रम..!

उपक्रमांत सहभागी व्हायचे भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर यांचे आवाहन…..!

चिंदर | विवेक परब : भाजपा नेते व केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त मालवण तालुक्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय उद्योग मंत्री यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस असल्याने आरोग्य उपकेंद्र गोळवण येथे रुग्णांना फळ वाटप आणि बेडशीप भेटवस्तू वाटप, मठबुद्रुक शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रूग्णांना फळवाटप तसेच कातकरी समाज वस्तीवर कपडे वाटप, चिंदर येथे विविध रस्त्यांचे शुभारंभ, माळगांव येथे नेत्र तपासणी शिबीर आणि अन्य ठिकाणी लोकपयोगी, सामाजिक, शैक्षणिक तसेच चिंदर येथे जिल्हास्तरीय दिंडीनृत्य स्पर्धा, विविध कार्यक्रम, विकास कामांची भूमिपूजने करण्यात येणार आहे या उपक्रमांत सहभागी व्हावे असे आवाहन भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर यांनी केले आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स