वैभववाडीतील पर्यटन स्थळांच्या निधी उपलब्धतेची श्री. संदेश पारकर यांची पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंकडे मागणी…!
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण , व वैभववाडी तालुक्याचा पर्यंटनदृष्टया विकास व्हावा यासाठी शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके उपस्थित होते.
वैभववाडी तालुका हा बहुतांश ग्रामीण क्षेत्र असुन कोकण सह्याद्रीचा निसर्गसंपन्न भाग आहे. याठिकाणी राज्यातुन अनेक पर्यटक भेट देत असतात. याठिकाणच्या नापणे गावात बारमाही धबधबा वाहत असतो. परंतु पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच ऐनारी गावात ऐतिहासिक पांडवकालीन गुहा आहे. परंतु निधीअभावी येथे सुविधा उपलब्ध नसल्याने हि गुहा दुर्लक्षित झालेली आहे. नापणे धबधबा तसेच ऎनारी गुहेच्या सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करुन दिल्यास वैभववाडी तालुक्याला पर्यटनदृष्ट्या महत्व प्राप्त होणार आहे असे श्री.पारकर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितले.
नापणे व ऐनारी येथील पर्यटन स्थळांना भरगोस निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. श्री.ठाकरे यांनी या दोन्ही पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण करण्याबाबतचा अहवाल मागवून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन श्री.पारकर यांना दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)