ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईकांनी घेतली 'त्या' व्हिडिओची दखल…!

आमदार वैभव नाईकांनी घेतली 'त्या' व्हिडिओची दखल…!

प्रकाशन: 08 Apr 2022 06:25 PM
वाचन संख्या 66

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ येथे भव्य कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारले जात आहे. मराठी सिनेअभिनेते भरत जाधव यांनी कुडाळ येथे भेट देऊन नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाट्यगृहाच्या रंगमंच्याच्या प्लॅन बाबत व्हिडीओ प्रसारित करत सूचना केली होती. त्यामध्ये भरत जाधव यांनी नाट्यगृहाचा रंगमंच ३० फूटापर्यंत वाढविण्याची सूचना केली.

त्या व्हिडिओची तत्काळ दखल गेत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व आर्किटेक्ट यांच्यासमवेत आज नाट्यगृह व भंगसाळ नदीची पाहणी केली.याप्रसंगी कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचा रंगमंच २४ फुटावरून ३० फूटापर्यंत वाढविण्याची सूचना केली. त्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले.

नाट्यगृहाच्या इंटिरिअर प्लॅन बाबतही सिनेअभिनेते भरत जाधव यांसह जेष्ठ नाट्यकर्मींच्या सूचना लक्षात घेऊन नवीन प्लॅन बनविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कुडाळ भंगसाळ नदी येथे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार असून त्याची पाहणी देखील यावेळी करण्यात आली.लवकरात लवकर हे काम सुरु करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आवश्यक सूचना अधिकारयांना केल्या.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपविभागीय अधिकारी राजन चव्हाण, शाखा अभियंता प्रदीप पाटील, अमोल बिराडे, नाट्यगृहाचे आर्किटेक्ट अमोल कामत उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स