ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अन्यथा आठ दिवसांत 'आम्हीच' पवनपुत्र मार्केट खुले करु : वेंगुर्ले भाजपा शिष्टमंडळ....!

अन्यथा आठ दिवसांत 'आम्हीच' पवनपुत्र मार्केट खुले करु : वेंगुर्ले भाजपा शिष्टमंडळ....!

प्रकाशन: 08 Apr 2022 06:58 PM
वाचन संख्या 48

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले नगरपरिषदेचे पवनपुत्र भाजी मार्केटचे बांधकाम पूर्ण झाले तरी अद्याप त्या भाजी मंडईचे उद्घाटन झाले नसल्याने किरकोळ व्यापारी व भाजी विक्रेते यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .

एप्रिल व मे महिन्यात आंबा , फणस व फळांचा मोसम असल्यामुळे किरकोळ व्यापार्यांना भाजी मार्केट बंद असल्यामुळे उन्हात रस्त्याच्या कडेला बसावे लागत आहे .
तसेच विक्रेते रस्त्यावर बसत असल्यामुळे वाहन धारकांना ट्राफीकचा त्रास होत आहे . अशा पद्धतीने भाजी मार्केट सुरू न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वहातूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे .

ही अडचण लक्षात घेऊन , तसेच भाजी विक्रेते व किरकोळ व्यापारी यांनी भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या असता भाजपा शिष्टमंडळाने आज वेंगुर्ले नगरपरिषदेत जाऊन मुख्याधिकारी अनुपस्थित असल्यामुळे कार्यालयीन अधिक्षक संगीता कुबल यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले . तसेच येत्या आठ दिवसात पवनपुत्र भाजी मार्केट व्यापारासाठी खुले करावे अशी आग्रही मागणी केली . तसेच प्रशासनाने हे मार्केट व्यापारासाठी खुले न केल्यास भाजी विक्रेते व किरकोळ व्यापार्यांना सोबत घेऊन भाजपा हे मार्केट सुरू करेल असा इशारा भाजपा शिष्टमंडळाने नगरपालिका प्रशासनास दिला .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स