ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांबू आधारित विकास योजनेतून कोकण कृषी विद्यापीठाला 3 कोटी 52 लाख रुपयांचा निधी..!

बांबू आधारित विकास योजनेतून कोकण कृषी विद्यापीठाला 3 कोटी 52 लाख रुपयांचा निधी..!

प्रकाशन: 08 Apr 2022 06:09 PM
वाचन संख्या 102

मुंबई | ब्युरो न्यूज : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ‘माणगा’ प्रकारच्या बांबूच्या मूल्यवर्धनाद्वारे कोकणात उद्योजकता विकास कार्यक्रम करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाला 3 कोटी 52 लाखाचा घसघशीत निधी मिळणार असून राज्य शासनाने त्या साठी 1 कोटी 76 लाख रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.उर्वरित 50 टक्के निधी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत व लाभार्थी यांच्याकडून मिळणार आहे.या बाबतचा शासन निर्णय 4 एप्रिल रोजी जारी करण्यात आला आहे.

कोकणातील कडे कपार्या,सह्याद्री लगतची सुपीक जमीन ,अनुकूल वातावरण,प्रचंड पाऊस यामुळे कोकणात बांबू दर्जेदार आणि टिकाऊ होतो.येथील बांबू वर आधारित प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण मिळाले तर येथील तरुण स्वतःचे उद्योग उभे करू शकतात.हे ओळखून राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून बांबू आधारित उद्योजकता विकास कार्यक्रम राबविणास सन http://localhost/news/public/uploads/2021-22 आणि http://localhost/news/public/uploads/2022-23 या वर्षात कोकण कृषी विद्यापीठाला मान्यता दिली आहे.

या विकास कार्यक्रमासाठी राज्य शासनाने स्वतःचा 50 टक्के हिस्सा 1 कोटी 76 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 1 कोटी 36 लाख रुपये आणि अगरबत्ती निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणाला लाभार्थी यांचा हिस्सा 40 लाख रुपये असे एकूण 3 कोटी 52 लाख रुपयांच्या निधीतून कोकण कृषी विद्यापीठ उद्योजकता विकास कार्यक्रम राबविणार आहे.हया निधीतून बांधकाम,बांबू प्रक्रिया उपकरणे,अगरबत्ती उपकरणे,प्रशिक्षण खर्च,प्रशासकीय खर्च इत्यादी घटकांवर होणार आहे.
( फोटो : सौजन्य गुगल)

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स