ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हळवल श्री. राम मंदिर येथे १० एप्रिल रोजी श्री. राम नवमी उत्सव..!

हळवल श्री. राम मंदिर येथे १० एप्रिल रोजी श्री. राम नवमी उत्सव..!

प्रकाशन: 08 Apr 2022 04:51 PM
वाचन संख्या 171

२ एप्रिल पासून सूरु आहे सुश्राव्य किर्तन उत्सव..

कणकवली | प्रतिनिधी :प्रतिवर्षाप्रमाणे  श्रीराम सेवा मंडळ हळवल (मुंबई) यांच्या वतीने हळवल येथील श्री. राम मंदिर  येथे  श्री. राम नवमी उत्सव दि. ०२ एप्रिल ते १० एप्रिल  २०२२ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त २ एप्रिल गुढीपाडव्यापासून ९ एप्रिल पर्यंत भव्य किर्तन उत्सव साजरा केला जात आहे. कणकवली तालुक्यातील नामवंत किर्तनकार या किर्तन उत्सवात  सुश्राव्य  किर्तन सादर करत आहेत. 
       तर रविवार दि. १० एप्रिल २०२२  रोजी श्री. राम नवमी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता श्रीराम षोडशोपचार पूजा, सकाळी ०९ वा. उत्सवाचे ग्रामदेवतेला आमंत्रण, सकाळी १० वा. श्रीराम जन्माचे किर्तन , दुपारी १२ वा. श्री. राम जन्म सोहळा दर्शन व  तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. श्रीराम पालखीची अभंग रामनामाच्या घोषात प्रदक्षिणा, दु. १.३० महाप्रसाद, सायं ६.३० ते ७. ३० वा. वारकरी भाविक व बालगोपाळांचा हरिपाठ, रात्रौ ८ ते ९ वा. श्रीराम प्रासादिक भजन मंडळ हळवल यांचे सुश्राव्य भजन सादर केले जाणार आहे. रात्रौ ९ वा. श्रीराम पालखीचे अभंग रामनामाच्या घोषात प्रदक्षिणा, रात्रौ ११ वा. किर्तन, रात्रौ १२ वा. श्री शेवराई रवळनाथ नाट्यमंडळ हळवल संचालक अरुण राणे यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.  तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थ प्रसाद व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सेवा मंडळ हळवल (मुंबई) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स